1 2 3 4 5
image carousel by WOWSlider.com v7.4
आपले हार्दिक स्वागत आहे!!!

जय महाराष्ट्र

आई जगदंबा आणि छत्रपती शिवरायांच्या कृपेने, तसेच माझे आराध्य दैवत युगपुरुष शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने माझ्या लोकसभा सदस्य या भुमिकेतून जनसेवेची ही तिसरी वेळ. मा.शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दवजी ठाकरे आणि शिवसेना नेत्यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि आपला, माझ्या संभाजीनगर मतदारसंघातील बंधू-भगिनींचे पाठबळ या जोरावर गत कार्यकाळात विकासकामांसाठी प्रयत्न करता आले. लोकसभा सदस्य, त्यातही विरोधी पक्षातील सदस्य या नात्याने दिल्लीत काम करतांना, संभाजीनगर मतदारसंघासाठी विकासाच्या योजना आणतांना झालेली प्रचंड ओढताण, सत्ताधारी पक्षांकडून सातत्याने होणारा अटकाव यातून मार्ग काढत काही योजना या शहरासाठी-जिल्ह्यासाठी आणता आल्या याचे समाधान आहे.

विकास योजनांचा पाठपुरावा करतांना अतीशय प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागले, मात्र आपल्या सारख्या हितचिंतकांमुळे जिल्ह्यातील एकूण विकास योजनांच्या दृष्टीने काही कामे ही लक्षणीय राहीली. विकास कामांचा पाठपुरावा, या कामी झालेला प्रचंड पत्रव्यवहार आणि संबंधीत मंत्रालये, सचिव पातळीवरील संपर्क-संवाद आपल्यासमोर आहेच. याशिवाय विविध स्तरावरील बैठका, संभाजीनगर महानगरपालिकेसाठी खेचून आणलेल्या योजना, त्यासाठी झालेला पाठपुरावा आणि महानगरपालिका मिळालेला निधी.

सामाजिक कार्य
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांची जबाबदारी शिवसेनेने स्विकारली

  • पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामे पावसाळया आधी पूर्ण करा

धार्मिक कार्य
  • अयोध्येत राममंदिराचे निर्माण करा

  • महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते महापूजा

क्रीडाविषयक कार्य
  • भारतीय क्रिडा प्राधिकरण (साई) यांच्यातर्फे खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कार

  • राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ८०० मल्लांनी नोंदविला सहभाग

आरोग्यविषयक कार्य
  • दोन हजार नेत्र रूग्णाचे शिवसेनेच्या नेत्राचीकीत्सा शिबिरात डोळ्यांचे निदान

  • रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न